Admission Contact Helpline :
9175940037/9175270037
अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बदलत्या काळानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करत असते, या स्पर्धेच्या युगात आपली ग्रामीण भागातील मुले कुठेही मागे पडू नये, म्हणून अमृतवाहिनीने महाराष्ट्रात प्रथमच विद्यार्थ्यांना theory ज्ञाना बरोबरच प्रॅक्टिकल ज्ञान मिळावे या हेतूने उत्पादकता विकास केंद्राची स्थापना केली .यासाठी सिन्नर येथील Precision Auto या कंपनी बरोबर सहमती करार केला, त्या अंतर्गत महिंद्रा , फोर्स मोटोर्स व आदी कंपनीस लागणारे स्पेअर पार्टस Precision Auto या कंपनी मार्फत अमृतवाहिनीतील विद्यार्थो स्वतः बनवणार असून त्यास लागणारे CNC व CMM मशिन्स ही कॉलेज मध्ये अद्ययावत करण्यात आले आहे,
तयार करण्यात आलेले पाहिले प्रॉडक्टही संस्थेचे अध्यक्ष मा आ बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कंपनीस पाठवण्यात आले,
तसेच या करारा अंतर्गत, सदर कंपनी अमृतवाहिनीतील विद्यार्थ्यांना नोकरी साठी प्राधान्य देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री खैरनार यांनी सांगितले.
यापुढील काळात अनेक कंपन्यांसोबत सामंजस्य करार करणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए व्यंकटेश यांनी सांगितले,
या उपक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी श्री अनिल शिंदे, प्राचार्य एम ए व्यंकटेश , रजिस्ट्रार प्रा विजय वाघे, डॉ विष्णू वाकचौरे, प्रा रवींद्र ताजने, डॉ भास्कर बोरकर, प्रा बाळासाहेब शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाला विश्वस्त आ डॉ सुधीर तांबे, सौ शरयुताई देशमुख, हेही उपस्थित होते.
Location And Contact Details ; Amrutvahini College of Engineering
Sangamner – 422608
Dist. Ahmednagar (Maharashtra-India)
Tel: (02425) 259015/16/17/18 259148(P)
Fax: (02425) 259016